सदस्य:Chandusojatiya

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से


शून्यातून विश्व निर्माण करणारे डॉ चंदू सोजतीया

मेहनत परिश्रम हे माणसाचं भविष्य बदलू शकतं. यांच उत्तम उदाहरण म्हणजे सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतीया. चंदू सोजतीया यांचा जन्म १९६० साली साधारण कुटुंबात झाला. मात्र स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने, कष्टाने त्यांनी समाजात अढळपद निर्माण केलं. १९७५ मध्ये त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी ६० रुपये महिन्याने नोकरी केली. कॉलेजला असताना १९८० ते १९९२ दरम्यान छात्र संघाच्या राजनीतीमध्ये सुद्धा ते सक्रिय होते. छात्र संघाच्या निवडणुकीत चंदू सोजतीया ३ वेळा विजयी झाले. छात्र  संघाचं महासचिव पद त्यांनी त्यावेळी भूषवलं. १९८७ साली ते सौ. लता यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांच्या समाजामध्ये थाटामाटाने विवाह करण्याची परंपरा असतानाही त्यांनी अत्यंत साधेपणाने नोंदणी पद्धतीने विवाह केला. उदरनिर्वाहासाठी एफ एम सी जी, व्हिडीओग्राफी, फोटोग्राफी, शेअर दलाली , लॉटरी व्यवसाय  असे अनेक  काम करत असताना १९९९ साली त्यांनी केबल नेटवर्कच्या माध्यमातून मीडियाची सुरुवात केली. सिटी न्यूज चॅनेल सुरु केलं. अल्पवधीतच सिटी न्यूज चॅनेलने आपली छाप उमटवली आणि याचं कारण म्हणजे सिटी न्यूज चॅनेल सत्यतेच्या मार्गाने चाललं. मीडियाच्या माध्यमातून चंदू सोजतीयांनी  सामाजिक कार्य सुरु केलं. के बी सी च्या धरतीवर “कौन बनेगा चॅम्पियन” कार्यक्रम चालवून शहरातील अनेक समस्या सोडविल्या. साधारण परिस्थिती असतानाही त्यांनी स्वबळावर उत्तम शिक्षण घेतलं. एम ए ला त्यांनी मेरिट मध्ये स्थान मिळवल. शिक्षण : डी टेक्स, एम कॉम, एम बी ए, एन डी डी वाय MA,  M com, MBA, NDDY,MJMC, D.TAX  PHD (Submitted) अश्या पदव्या घेऊन सामाजिक कार्याला अभ्यासपूर्वक पार्श्वभूमी दिली. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापिठाकड़े त्यांनी पी एच डी करता प्रबंध सादर केला असून लवकरच त्यांना आचार्य पदवी मिळणार आहे.  सक्करसाथ मधील छोट्याश्या कार्यालयापासून सिटी न्यूजची सुरुवात झाली. सिटी न्यूजच्या कार्यामुळे चंदू सोजतीयांच्या जिद्दीने कष्टाने त्यांनी लावलेल्या छोट्याश्या रोपट्याचा वटवृक्ष झाला. त्याच वेळी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून २०१४ साली  एम जे एम सी करून मिरिटमध्ये स्थान मिळवलं. न्यूजच्या माध्यमातून केवळ बातम्यांच क्षेत्र व्यापलं नाही तर, एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देणं, एखाद्या अधिकाऱ्या विरोधात एखाद्या व्यक्तीची तक्रार असेल तर अधिकाऱ्यांचीही बाजू जाणून घेणं. निडरतेने, निर्भयतेने सत्याचा पक्ष मांडणे, बातम्यांच्या माध्यमातून राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक अशा प्रत्येकच क्षेत्रात सिटी न्यूजने आपला ठसा उमटवला. दबदबा निर्माण केला. या कार्याबद्दल छोटे मोठे अनेक पुरस्कार चंदू सोजतीयांनी  मिळविले. चंदू सोजतीयांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सर्वोच्च पुरस्कार “प्राईड ऑफ इंडिया” चंदू सोजतीयांना तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल व ३ राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रेल्वेच्या प्लेट्स काढताना २ समाजकंटकांना चंदू सोजतीयांनी पाहिलं व जीवाची पर्वा न करता त्यांना पकडण्यासाठी त्यांनी धाव घेतली या अश्या अनेक निर्भीड कामांबद्दल चंदू सोजतीयांना विविध पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आलं. चिरोडी येथील आश्रमशाळेतील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सिटी न्यूज पोहचली असता, तेथील समाजकंटकांनी कॅमेरा हिसकला. तो आजतागायत मिळालेला नाही. गरीब श्रीमंत प्रत्येकाच्या न्यूजला सारखाच सिटी न्यूज वर न्याय दिला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव दुर्गोत्सव मंडळ, विविध मंडळांचे देखावे, शोभायात्रा धार्मिक कार्यक्रम यासह क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातही सिटी न्यूज चॅनेलच नाव आहे. तसच राजकीय चर्चा विश्लेषण व सटीक अनुमान हेदेखील सिटी न्युजच वैशिष्ट्य आहे. नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी, आजारांबाबत घ्यावयाची काळजी व उपाययाबाबत माहिती देण्यासाठी सिटी न्यूज चॅनल तर्फे हेल्थ केअर चाट शो चालविण्यात येतो आहे. त्यामागे आहे सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सोजतीया यांची मेहनत. महाराष्ट्रातील गायकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी सिटी न्यूज चॅनेल तर्फे “सुरो की जंग कराओके के संग” या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्रभरातून या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये गाण्यातील दृश्य देखावे साकारण्यात आले. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आला. यावेळी राधा मंगेशकर, दिलीप सेन यांच्यासह चित्रपट सृष्टीतील दिग्गज उपस्थित होते. मेरे राम या नाट्याच यशस्वी आयोजन चंदू सोजतीयांनी केलं. सामाजिक दायित्व निभावताना आपल्या समाजाप्रती देखील ते योगदान देताहेत. श्री ओसवाल संघाचे अध्यक्षपद सध्या ते भूषवताहेत. ओसवाल संघाच्या वतीने चंदू सोजतीयांच्या अध्यक्षतेत विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. नुकतंच रंगीलो राजस्थान या कार्यक्रमाच आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आलं. राजस्थानी मातीचा सुगंध या कार्यक्रमातून अमरावीमध्ये दरवळला. पत्रकारांची संघटना प्रेस क्लब ऑफ अमरावतीचे ते उपाध्यक्ष आहेत. आपल्या मेहनतीने त्यांनी “शून्यातून विश्व निर्माण” केलं आहे. सक्करसाथ येथील कार्यालयाचे स्थलांतर मोर्शी मार्गावरिल सहकार भुवन समोरील मातोश्री आर्केड येथील अत्याधुनिक व सुसज्ज स्टूडियो आणि कार्यालयामध्ये झालं. तेव्हा पटतंय की रोपट्याचा वटवृक्ष झालाय. सिटी न्यूज चॅनेल च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत राहून स्वबळावर चंदू सोजतीयांनी आदर्श स्थापित केलाय.