सामग्री पर जाएँ

आगस्टस चार्ल्स टेक्सियेरा द अरागाओ

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

कोंडाजी फर्जंद History of Swaraj

कोंडाजी फर्जंद


जंजिऱ्याच्या गुहेत शिरून दारूगोळा उडविण्याचा धाडसी प्रयत्न करणारे नररत्न!

स्वराज्याची शान असणारा बलाढ्य अंगापिंडाचा पन्हाळा किल्ला गनिमी काव्याने शक्ती आणि युक्तीने घारी सारखी झडप घालून ताब्यात घेत तो पुन्हा स्वराज्याला समर्पित करणारा पराक्रमी शिलेदार कोंडाजी फर्जंद.

कोंडाजी कोकणातूनच महाड, पोलादपूर, चिपळूण, खेड या मार्गाने अगदी गुपचूप बिनबोभाट राजापुरास पोहोचले. तेथूनच चोरट्या पावलांनी जाऊन त्यांनी पन्हाळ्याचा वेध घेतला. जिथे पहारे कमी आहेत अशी जागा हेरून कोंडाजी दि. ६ मार्च १६७३ ला सोबत अवघे ६० वीर मावळे घेऊन गडावर चढले. फाल्गुन वद्य त्रयोदशीच्या मध्यरात्री किर्रर्र.. अंधारात ठरल्याप्रमाणे 'हरहर महादेव' चा बुक्का उधळला. तशी गडाला जाग आली.

गनिमाला चकविण्यासाठी गडावर पोहचल्यावर मावळ्यांनी शंख फुंकले. रणवाद्य वाजवली, घोषणा देत, आरडाओरड करत आदिलशाहीच्या सैन्यावर चाल केली. या अतर्क्य प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला व मराठे मोठ्या संख्येने आले आहेत असे समजून शत्रू पक्षा bhचे अवसान गळाले.

किल्लेदार बाबूखान व कोंडाजी यांच्यातील महाभयंकर युद्धात किल्लेदार पडल्याची बातमी ऐकताच बाबूखानाच्या सैन्याची घाबरगुंडी उडाली. सैनिक सैरावैरा पळू लागले, पण गडावरील मावळ्यांनी त्यांची दाणादाण उडवत गड ताब्यात घेतला. आदिलशाहीचा एक मातब्बर गड अवघ्या साठ मावळ्यांनी ताब्यात घेत पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल केला.

पन्हाळासारखाच जंजिऱ्याच्या गुहेत शिरून दारूगोळा उडवण्याचा धाडसी प्रयत्न कोंडाजीने केला. त्यावेळी जंजिऱ्यावर असणाऱ्या खैरत खान व सिद्दी कासम या आफ्रिकन हबशांकडून तटावरील प्रजेचा होणारा अतोनात छळ पाहून संभाजी राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण करण्याचा बेत आखला. सन १६८२ ला कोंडाजी आपल्या बारा मावळ्यांसह जंजिऱ्याच्या गुहेत शिरून योग्य वेळी तेथील दारुगोळा उडवण्याचा धाडसी मनसुबा घेऊन सिद्धीच्या चाकरीला गेले; पण दुर्दैवाने जंजिरा ताब्यात घेण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहिले.

साक्षात मृत्यूच्या मगरमिठीत अडकले असताना देखील कोंडाजींनी ताठमानेने मरण पत्करले. सिद्धी पुढे ते 'ना वाकले ना झुकले कारण.... 'मरण आले तरी चालेल पण शरण जायचं नाही....' ही स्वराज्याची कवण त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपली. धन्य ते कोंडाजी....

                    🍁⃢Ji_tendra_Marathe

सन्दर्भ

[संपादित करें]