यमक अलंकार

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
(यमक से अनुप्रेषित)
Jump to navigation Jump to search

जब एक शब्द का प्रयोग दो बार होता है और दोनों बार उसके अर्थ अलग-अलग होते हैं तब श्र्लेश अलंकार होता है।

उदाहरण - १ ऊँचे घोर मन्दर के अन्दर रहन वारी, ऊँचे घोर मन्दर के अन्दर रहाती हैं। (यहाँ पर मन्दर के अर्थ हैं अट्टालिका और गुफा।) २ कनक-कनक ते सौ गुनी मादकता अधिकाय, या खाये बौराय जग, वा पाये बौराय। (यहाँ पर कनक के अर्थ हैं धतूरा और सोना।) {{आधार}

  • काव्यातील यमकाबद्दल...थोडंसं*

(खरे तर अलीकडे अशा प्रकारे थोडेसे वैचारिक लिहिताना अधिकच भीती वाटते. तरीही ही पोष्ट कोणाच्या कवितेबद्दलची टीका नाही. तसे वाटल्यास केवळ योगायोग समजावा.)

  • यामुळे कोणाच्या मनास लागल्यास उदार अंतकरणाने क्षमा करावी.*

अनेक लोक लिहिते झालेत हीच मुळात आनंदाची गोष्ट आहे. मात्र काही वेळा घडी विस्कटलेले काव्य वाचताना जीव कासावीस होतो. यमक हा कवितेचा प्राण आहे. त्यामुळे कवितेला नादमाधुर्य प्राप्त होते. लय साधली जाते, म्हणून वृत्त,छंदयुक्त काव्यात यमक आवश्यक असतेच. गझल काव्यप्रकारात तर त्याशिवाय पानच हलत नाही. यमक सलग दोन अोळीत किंवा चारोळीत दुसऱ्या चौथ्या ओळीत साधले जाते. अभंग/ओवीत दुसऱ्या तिसऱ्या ओळीत साधले जाते. गितात तर चरणातील ओळींबरोबरच प्रत्येक चरणातील शेवटच्या ओळीतही यमक साधले जाते. अशाप्रकारे उत्तम यमक साधलेले गीत मनात रेंगाळत राहते. यमकाचे स्थान ओळीच्या शेवटी (शेवटच्या शब्दांत) असते हे सर्वश्रुतच आहे. केवळ शेवटच्या शब्दांतील शेवटचे अक्षर एकसारखे आल्याने/योजल्याने यमक साधले जाते, मात्र त्यास अत्युच्च उंची तेव्हाच प्राप्त होईल. जेव्हा... शेवटचे अक्षर, उपान्त्य अक्षर,त्याअगोदरचे अक्षरही एकसारखे असेल.(यमकासाठी केवळ शेवटचा एकच शब्द पुन्हा घेतल्यास/योजिल्यास मात्र उंची फारच खुजी होते.) किमान यमक साधलेल्या/साधावयाच्या शब्दांतील क्रमाने येणाऱ्या प्रत्येक व्यंजनातील स्वर समान असायला हवेत. उदाहरणाने हा विचार अधिक स्पष्ट होईल.

_(ड)_

  • निकृष्ट यमक*

या प्रकारात ओढून-ताणून यमक योजिले जाते. थोडक्यात या प्रकारचे यमक साधलेल्या कवितेस 'र' ला "र" आणि 'ट' ला "ट" जोडून केलेले काव्य म्हणता येईल.

_(क)_

*सामान्य यमक*

१)-------------------होते


गाते

२)-------------------आई


सोयी

३)-----------------घालताना


अवहेलना

इत्यादी.

काही जोड्या

पाय होय पेय

दारात ओळीत एकांत


पाहतो दोहितो झेलीतो


_(ब)_

  • उत्तम यमक*

१)-------------------होते


गोते

२)-------------------आई


जाई

३)-----------------घालताना


चालताना

इत्यादी. काही यमकाच्या जोड्या. बाप साप ताप थाप धाप पाप

नाटक काटक फाटक

अंधार गंधार नंदात

पाहताना साहताना नाहताना

बसलेले फसलेले हसलेले नसलेले वसलेले

सळसळले कळकळले भळभळले मळमळले

_(अ)_

  • चमत्कृतिपूर्ण यमक*

या प्रकारचे यमक भाषेतील शब्द साठा विपुल असणारे विद्वानच साधू शकतात. कारण तोच शब्द तोडून विभागून विभिन्न अर्थांच्या छटा या प्रकारात आणल्या जातात.

१) --------काल सांज होताना

  -----+++सूर्य लाल होता ना!

२) -----------औषध न लगे मजला ।


औषध नल गे मजला ।

३)-----------भेटवा सकाळी


भेट वास काळी

. © *Chandrakant